“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

0
236

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारण्यात आलं असता त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असं सांगितलं. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झालं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, त्यामुळे पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच”

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ- निलेश राणे

राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापाैरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here