पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
252

नाशिक : पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीनं पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी महाविकास आघाडी सरकारमधील नेता असलेल्या मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश, मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणी चर्चेत, चौकशीतून सत्य बाहेर येईल, राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढलेत, राठोड अनेक वर्ष राजकारणात,  राठोड विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच- अतुल भातखळकर

कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here