औरंगाबाद : मंदीर, मशिद उघडण्यावरून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. इम्तियाज जलीलांनी शहागंज येथील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.
लॉकडाऊनमध्ये अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. असं असतानाही इम्तियाज जलील यांनी केलेल्या या घोषणेमुळे पोलीस प्रशासन आणि एमआयम कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, त्यामुळे मंगळवारप्रमाणे आजही औरंगाबादमध्ये तणावपूर्वक वातावरण पहायला मिळायची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करतय; निलेश राणेंची टिका
राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवत आहेत- एकनाथ खडसे