चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब 10 हजार रूपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील 8 ते 9 हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार असल्याचं विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं.
पुढील 2 ते 3 दिवसात पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर सर्व्हे करुन पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना 95 हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी 50 हजार आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे.
दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजारांची मदत दिली जाणार असून परवापासून नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावे- किशोरी पेडणेकर
पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी ‘या’ तारखेपर्यंत बंद
हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?; चंद्रकांत खैरेंचा जलीलांना सवाल
शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती