मुंबई : महापाैर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाची कंपनी ज्या पत्त्यावर नोंद आहे, त्याच पत्त्यावर आणखी आठ कंपन्यांची नोंदणी आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावे, अशी घणाघाती टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. त्यांनी ते सिद्ध करावे, असं माझं त्यांना आवाहन आहे. याप्रकरणी 100 टक्के चौकशी व्हावी. आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देवून राजकारणातून निवृत्त होईन. आरोप सिद्ध न झाल्यास किरीट सोमय्या यांनी राजकारणातून कायमचं निवृत्त व्हावं, असा निशाणाही किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर लगावला आहे.
दरम्यान, मी आतापर्यंत कधीच बोगस काम केलं नाही. यापुढेही करणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी ‘या’ तारखेपर्यंत बंद
हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?; चंद्रकांत खैरेंचा जलीलांना सवाल
शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती
मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक; मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार