नवी दिल्ली : कर्नाटकामधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दमदार विजय झाला आहे. 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला 6 जागांवर विजय मिळाला. हा विजय निश्चित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला
‘कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे , जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेचा पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,’ असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
‘कर्नाटकमध्ये आता जोडतोडीचं नाही तर स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे. झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही, असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरही टीका केली.
काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर करून घेते. त्यानंतर आपल्या हितासाठी सोबत असलेल्या पक्षांना वापरून घेते. याचा परिणाम म्हणजे लोकांना कधीही चांगलं सरकार मिळत नाही,’ असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज होणार स्वस्त; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही”
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव
“शिवसेनेनं हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद घेतलंय”