“…तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा”

0
311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय षडयंत्रं आहे, असा सवाल करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधलाय.

काश्मीरमधील पंडितांच्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगालदेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. हिंदू खरोखरच खतरे में है असं वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवतांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, करणार आहात का नेतृत्व? हिंदूंबाबत आपल्या देशात काय चाललं आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : …तरी भाजपला कोणीच पराभूत करू शकत नाहीत; अमित शहांंचं मोठं वक्तव्य

त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करीता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय?, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

नक्षलवाद्यांनो हिंसेचा मार्ग सोडा नाहीतर तुमचा बिमोड करणारच; एकनाथ शिंदे

भाजपचा शिवसेनेला मोठा दणका; शिवसेनेचे ‘हे’ बडे नेते भाजपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here