येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

0
151

पुणे : शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे.

येत्या 8 दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. मात्र, या मंत्र्याच नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच तुमच्या कर्मानेच तुम्ही मरणार आहात, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?- रूपाली चाकणकर

“देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यामुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी कोण याचा खुलासा करणार- मराठा क्रांती मोर्चा

“दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here