मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या सभागृहात ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमएमआर रिजनमधील महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केलं.
देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलाॅक करण्याची घाई करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आधी सर्व सुरु करायचं आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली; ‘इतके’ लोकं अडकल्याची भीती
“केंद्र सरकारची ई-पासबाबत नवीन सूचना; पण महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही”
सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे- अजित पवार
“गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा डीएनए आहे”