मुंबई : कोरोना संकटामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का बसला आहे. तसेच देशातील मंदिरं अद्यापही बंदच आहेत. मंदिरं खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मंदिरं खुली करण्याचं आवाहन केलं आहे.
मंदिराचेही एक अर्थकारण असतेच आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत आणि मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, असं आवाहन सामनातून करण्यात आलं आहे.
दरम्यान, देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल आणि त्यात काय चुकले? आम्ही स्वत मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत, असं देखील सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राहुल गांधी हे सक्षम, संयमी आणि संवेदनशील नेते; त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं- अशोक चव्हाण
“मी पद सोडायला तयार, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा”
… या कारणामुळे विराट कोहली RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत
तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाला प्रार्थना