“…तर मी देवेंद्र फडणवीस यांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारेन”

0
1257

मुंबई : जर देवेंद्र फडणवीसांनी भावासारखं फक्त ट्रीट केलं तरी त्यांना अगदी त्याच हक्काने देवेंद्रभाऊ अशी हाक मारू शकतो, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.

मी देवेंद्र भुयार यांना भाऊ अशी हाक मारतो. ते संघटनेतून आलेले आमदार आहेत. त्यांना मी हक्काने भाऊ म्हणतो. जर देवेंद्र फडणवीसांनी भावासारखं फक्त ट्रीट केलं तर त्यांनाही अगदी त्याच हक्काने देवेंद्रभाऊ अशी हाक मारेन, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

जेव्हापासून आम्ही त्यांना विधानसभेत पाहत आहोत त्या दिवसापासून अजूनपर्यंत शांततेत कोणतीही चर्चा विधानसभेत झाली नाही. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहू काय घडतं?, असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

दरम्यान, विधानसभेत त्यांनी तुम्हाला भावासारखं ट्रीट केलं नाही का? असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार

“माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष उभारला आहे; पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे”

“वारिस पठाण यांचं वक्तव्य मुस्लिम समाजालाही मान्य नाही”

…तर पवारांची औलाद सांगणार नाही- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here