“सावरकर हे भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय”

0
13

मुंबई : स्वतंत्र्यवीर सावरकर हे भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असं भाजपच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये, असा टोला शिवसेनेनं सामनातून भाजपला लगावला आहे.

दरम्यान, भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत ‘शुद्धी’चे प्रयोग त्यांनी केले, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

..तर ते भ्रमात आहेत; शिवसेनेचा सामनातून भाजपवर निशाणा

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेवर अमृता फडणवीसांच प्रत्यृत्तर, म्हणतात…

ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी

“सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करुया”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here