मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आज सर्वत्र गणरायांचं आगमन होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व गणेशभक्तांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेत आहोत तीच पुढेही घ्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, गणरायाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोव्हिड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं स्पष्टीकरण
वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
“विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय”