Home महाराष्ट्र “सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”

“सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; त्यामुळे…

सामनाचे संपादक तोंडावर पडले- नारायण राणे

जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी

…पण नियती कोणालाही सोडत नाही; न्यायालयाच्या निकालानंतर निलेश राणेंचं ट्विट