मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रशियाने बनवलेली लस बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता. आम्ही आमच्या मस्तीत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
दरम्यान, हीच लस अमेरिकेत सर्वप्रथम बनली असती तर ट्रम्प यांचं काय कौतुक आपण केलं असतं. आज ज्या मंत्र्यांना व बड्या अधिकाऱ्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी रशियाची लस गुप्त मार्गाने आधीच आणली असेल, पण देशातील लाखो गोरगरीबांना वाली कोण? असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न; बारामतीत बैठक”
विश्व क्रिकेटला तुझ्या हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल माही; धोनीच्या निवृत्तीवर अमित शहांचं ट्विट
धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना