पुणे : पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्यपालांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
ध्वजारोहण संपल्यावर राज्यपाल आणि अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये, असा मिश्कील डायलॉग राज्यपालांनी ऐकवला. त्यावर मास्कमध्ये हस्त अजित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांना दंडवत घातला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ चांगलीच गाजली होती. त्यावेळी शपथ देणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्याशी अजित पवार यांचे खास सूर जुळले आहेत. त्यामुळे ही शाब्दिक टोलेबाजी रंगली.
महत्वाच्या घडामोडी-
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार
अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह”