Home महाराष्ट्र अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘मार्मिक’च्या हिरक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढाई सुरू केली, तेव्हा हरण्या जिंकण्याची फिकीर केली नव्हती. हाच शिवसेनेचा विचार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी पण 60 वर्षांचा झालो आणि मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते 60 वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचं समाधान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह”

5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच पोलिस खात्यावर संशय व्यक्त करत आहेत; मुश्रीफांचा फडणवीसांना टोला

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार- अजित पवार