सातारा : राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री उशीरा त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बाळासाहेब पाटील यांची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार- अजित पवार
पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज