मुंबई : महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी’ पणाचा दर्प देवेंद्र फडणवीसांना नडला, असं म्हणत फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ‘झी 24 तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत ते बोलत होते.
मी पुन्हा येईन या वाक्यावरुन बरीच टिका झाली. परंतू ती अनेकांना फार आवडली. ती व्हायरल झाली. त्यात मी पणाचा दर्प नव्हता. मी पुन्हा येईत ते लोकांची सेवा करण्यासाठी असंच मी म्हटलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाच वर्ष मी त्या पदावर बसूनही मी कधी झालो नाही, सेवक राहिलो. कुटुंबाला वेळ दिला नाही. जे काम सोपावलं ते करायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याबद्दल मला समाधान वाटंत. गर्व वैगेरे विषयच नाह, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
दरम्यान, मी म्हणजे सगळं बाकी सगळे तुच्छ अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोकांना हे आवडत नाही. लोकांना ‘मी’पणा आवडत नाही. विनम्रता आवडते, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे
सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच
मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय