अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता ‘या’ महिला भाजप आमदार म्हणतात…

0
730

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अमृता फडणवीस यांनी देशमुखांवर केलेल्या टीकेबाबत श्वेता महाले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी हा संस्काराचा विषय नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख वयाने मोठे आहेत. त्यांचा आदर आम्ही नक्कीच करतो. तसंच ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे ते चौकशीला सामोरे का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतोय, असं श्वेता महाले म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस या उपरोधिकपणे बोलल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सिनियर नेत्या म्हणून विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे, असही श्वेता महाले यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

आजचा दिवस राष्ट्रवादी पक्षासाठी लाभदायी; गुहागर नगराध्यक्षांसह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here