Home महाराष्ट्र राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट

राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : नगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. मात्र एक अट आहे. तुम्ही जर औसा नगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून दिले तरच हा निधी तुमच्याकडे येईल, असं वक्तव्य  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. हे वक्तव्य चांगलंच गाजतंय. औसा येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

हे ही वाचा : मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा

औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत’ अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.

दरम्यान,  आता 100 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या अजित पवारांच्या शब्दाकडे औसा येथील जनता कशी पाहते, हे पहावे लागेल.

महत्वाच्या घडामोडी –

कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी…; शरद पवारांनी दिला अठवणींना उजाळा

“गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला गरिबांची सेवा करण्याचा वारसा दिलाय, अन् तो आपण गावागावापर्यंत पोहोचवायला हवा”

“मनसेचा डबल धमाका; शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”