मुंबई : कोरोनाची परिस्थिती अतिशय संयमपणे हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सर्वत्र कौतुक झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या कामावर मोहोर लागली आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये आले आहेत.
मूड ऑफ द नेशन नावानं 15 जुलै ते 27 जुलै या कालावधीत इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने हे सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती. तसंच राज्य सरकारविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
दरम्यान, या सर्वेक्षणात 24 टक्के मतांसह पहिल्या क्रमाकांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. तर 15 टक्के मतांसह अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी 11 टक्के मिळवून तिसऱ्या क्रमांकावर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 9 टक्के मिळवून चौथ्या क्रमाकांवर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 टक्के मतांसह पाचव्या क्रमाकांवर आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय”
पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे; नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे पत्र
पावसाचा जोर ओसरल्याने सांगलीत पुराचा धोका टळला; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट