नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचं काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र आता आशा सेविकांनी संप पुकारला आहे. आशा सेविकांच्या संपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील 6 लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. याच मुद्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला सुनावलं आहे. देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारलेला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे; नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे पत्र
पावसाचा जोर ओसरल्याने सांगलीत पुराचा धोका टळला; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट
ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका