Home महाराष्ट्र सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…

सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं आहे.

कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.


महत्वाच्या घडामोडी-

निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही- नारायण राणे

‘रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एसटी निर्भयांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात; सुशांत प्रकरणावरुन केदार शिंदेंची प्रतिक्रिया

शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले- संभाजी भिडे