“…म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे”

0
801

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

हे ही वाचा : भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?; जयंत पाटलांचा सवाल

मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपाला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यामुळेच सध्या भाजपाकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे. मनसेची मते तशीही भाजपला मिळणार नाही म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची इच्छा फार आहे पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही,” असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांचं विधान

मोठी बातमी! कोल्हापूरात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशांची पाकिटं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here