पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवस पुणे दाैऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले.
पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासह उपस्थित असतील.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात जाऊन पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.
महत्वाच्या घडामोडी-
नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत
मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण; पुणे दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल
रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट; म्हणाली…