Home देश नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत

नवी दिल्ली : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचे अखेर भारतामध्ये लँडिंग झाले आहे. अंबाला एअर बेसवर ही विमाने बुधवारी दुपारी सुरक्षित उतरली. बऱ्याच काळापासून या विमानांची चर्चा होती. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ कैकपटीने वाढले आहे.

ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे.

राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।।, असा श्लोक मोंदींनी ट्वीट केला आहे

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण; पुणे दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल

रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट; म्हणाली…

“उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला भिती”