मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात सूट देण्याची मागणी केली आहे.
“राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. #वीजआकारणी #महावितरण #टाळेबंदी #कोरोनामहासाथ #MahaVitaran #electricitybill #Lockdown #CoronaCrisis@CMOMaharashtra pic.twitter.com/IFnxkBOZLw
— Raj Thackeray (@RajThackeray) July 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार
ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला- देवेंद्र फडणवीस
राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही; नितेश राणेंची राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका