मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतंच राष्ट्रवादीचे आध्यक्ष शरद पवार आणि मुस्लिम नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी बकरी ईद संदर्भातील नियमावलीवर स्पष्टीकरण दिलं.
“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. तसंच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,असंही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ‘इतक्या’ कोटींचा जीएसटी परतावा जाहीर”
भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…