राणेंना रातोरात अटक करणार पोलिस आता का गप्प आहेत; नाना पटोले प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

0
417

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर टिका केली. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जे वक्तव्य केले होते. त्यापेक्षा हे वक्तव्य भयानक आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत ? कारवाई का करीत नाहीत?, असा सवाल फडणवीसांनी यावेळी केली.

हे ही वाचा : औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा…; मनसेचा इशारा

दरम्यान, सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ! मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत, असा टोलाही फडणीसांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

देशातील एकमेव प्लग अँड प्ले औद्योगिक प्रकल्प म्हणून भूमी वर्ल्ड प्रसिद्ध

“शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल”; भाजप नेत्याचा इशारा

सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले; अमृता फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here