पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.
तिघेही भांडतात, मग परत काहीच झालं नाही, असं सांगतात. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीत, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, असा टोला यावेळी चंद्रकांत पाटलांनी लगावला. सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहायला सांगितला तरी ते लिहीतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं, पुण्याची चिंता करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित पवार अपयशी ठरत आहेत, हे दाखवायचे प्रयत्न कोण करत आहे, हे तुम्ही पहा असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे चंद्रकांत पाटलांनी इशारा केला.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकट; तब्बल 640 लोकांना झाली ‘या’ विचित्र आजाराची लागण
…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे
“फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील”