मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यात हे तीनचाकी सरकार आहे असं म्हणतात… रिक्षासारखं… असा विरोधकांचा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
विरोधी पक्ष कायम टीका करतो की हे तीन चाकांचं सरकार आहे. तीन चाकं तर तीन चाकं… ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे,. मागे एकदा एनडीएच्या बैठकीत गेलो होतो तेव्हा तिथे तर 30 ते 35 घटक पक्ष होते. शिवाय राज्याराज्यांमध्ये अपक्षांचीही साथ त्यांना आहेच. म्हणजेच आपलं सरकार हे जर तीन चाकी रिक्षा असेल तर एनडीए ही तर रेल्वे गाडी आहे” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, बुलेट ट्रेन की रिक्षा असा प्रश्न विचारलात तर मी रिक्षाच कारण आपलं सरकार हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे. त्यामुळे माझा पाठिंबा हा रिक्षेलाच असेल. सत्तेवर आलो तरीही बुलेट ट्रेनचा प्रकल्प मान्य नाही केला. कारण बुलेट ट्रेनची गरज नाही हे जसं महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं तसंच ते मलाही वाटतं. जनतेला काय वाटतं ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, असंही उद्ध ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकट; तब्बल 640 लोकांना झाली ‘या’ विचित्र आजाराची लागण
…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला- उद्धव ठाकरे
“फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील”
…अन् जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला