नंदूरबारमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर झेंडा फडकवला

0
530

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नंदूरबार : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पहायला मिळत आहे.

धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीवर शिवसेनेनं बाजी मारली आहे. नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेनं भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का देत 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे.

हे ही वाचा : कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

दरम्यान, काँग्रेस नेते के. सी. पाडवी  यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतीवर काँग्रेसला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं, तर भाजप आमदार डाॅ.विजयकुमार गावित यांनी एका जागेवर विजय मिळवला.

महत्वाच्या घडामोडी – 

“अहमदनगरमध्ये मनसेनं खातं उघडलं, शिरसाठीवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा झेंडा फडकला”

“नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज होणार जाहीर, कोण मारणार बाजी?”

भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here