नवी दिल्ली : कारगील विजयाला आज 20 वर्ष पूर्ण झाली. 1999 मध्ये पाकिस्तानच्या कुटिल मनसुब्यांवर मात करत त्यांना रणभूमीवर भारतीय सैन्याने धूळ चारली होती. या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धाबाबत ज्या अभिमानाने आपण बोलतो, त्या युद्धातील खरे म्हणजे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा.
कारगील युद्धाच्या काळात सर्वात कठीण टोलिंग पर्वत रांग आणि 4875 पॉईंट ताब्यात घेण्यात कॅप्टन बत्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. विक्रम बत्रा यांनी श्रीनगर-लेह मार्गाजवळचा 5140 पॉईंट शत्रूच्या ताब्यातून मुक्त केला होता. विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता.
लेफ्टनंट अनुज नैय्यर यांच्या मदतीने विक्रम बत्रा यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. मात्र त्याच वेळी लेफ्टनंट नवीन यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. आपल्या सहकाऱ्यावर हल्ला झालेला पाहून विक्रम बत्रा स्वत: नवीन यांच्या समोर ढाल बनून उभे राहिले. मात्र यावेळी शत्रूची एक गोळी त्यांच्या छातीत लागली. हाच तो दिवस होता ज्यावेळी अवघ्या 24 वर्षांचे कॅप्टन विक्रम बत्रा देशासाठी शहीद झाले.
दरम्यान, कारगील युद्धातील सर्वात महत्वाच्या लढायांपैकी एक या लढाया होता. कॅप्टन बत्रा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य त्यांचा ‘शेर शाह’ असा उल्लेख करतात.
महत्वाच्या घडामोडी-
धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन
“माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता”
आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवत आहेत- शरद पवार
शरद पवारांचं खाजगी डॉक्टरांना इंजेक्शन; म्हणाले…