नाशिक : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिक दौरा केला. यावेळी कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. ते 20 लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले?, असा सवाल करत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा करोना दूर कसा पळवता येईल या कामावर लक्ष द्यावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
दरम्यान, रूग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे त्यांनी आता स्वत:हून पुढे यायला हवं. आणि जर येत नसतील तर त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असं पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून मी मंत्रालयात जात नाही- उद्धव ठाकरे
त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने…; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
शाळा आता नाही, पण…; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा