नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला.
राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. असं करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये, ही आमची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते, खासगी रुग्णालये जास्तीचं बिल घेत आहेत. त्यांचे ऑडिट केलं जात असून, यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांनीही आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आर्थिक संकट मोठं आहे. लॉकडाउनचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात यावा. मात्र, स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा कशा प्रकारच्या आहे, त्यावरून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात यावा, असंही पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
…तेंव्हा सरकारने माझं ऐकलं नाही आणि; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
भाजपने पाठवली शरद पवारांना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली 1 हजार पत्रं
अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा
… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश