Home महाराष्ट्र राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या कामाच्या भूमिपूजनावरुन  केंद्र सरकारला टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.

“अलिकडे व्हाट्स अ‍ॅपवर एक मेसेज फिरत आहे. कोरोना संकट काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावत आहे, देव उपयोगी पडताना दिसत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हेच खरे देव आणि देवदूत आहेत, हे सिद्ध झालं आहे. देवाचा कुठेच पत्ता नाही, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार यांचं विधान आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, असं शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? : निलेश राणेंचा सवाल

राजू शेट्टी यांचं दूध दराचे आंदोलन म्हणजे…; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; म्हणाले…

सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील