सोलापूर : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
पालकांनी परीक्षेबाबत चिंता करु नये; लवकरच निर्णय घेऊ- उदय सामंत
“कोरोनामुक्त होताच ‘या’ भाजप आमदाराने केली मोठी घोषणा”
शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाचा संसर्ग; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ
महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज- चंद्रकांत पाटील