Home महाराष्ट्र महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज- चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिने आयोगाचे ऑफिस बंद आहे, हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना हे ऑफिस बंद असणे चुकीचे आहे, असं मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर ठरलं! अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन”

सचिन सावंतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- देवेंद्र फडणवीस

21 तारखेपासून सांगलीत 100 टक्के लॉकडाऊन?; यावर जयंत पाटलांचा खुलासा

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला यामुळे…; राहुल गांधींचा भाजपवर आरोप