Home देश “अखेर ठरलं! अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन”

“अखेर ठरलं! अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन”

अयोध्या : देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत आहे. उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. कोरोनामुळे या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील.

राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरलाय. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे केवळ 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचं नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तसेच हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं जाणार याचीही उत्सुकता आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सचिन सावंतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- देवेंद्र फडणवीस

21 तारखेपासून सांगलीत 100 टक्के लॉकडाऊन?; यावर जयंत पाटलांचा खुलासा

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला यामुळे…; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान