काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर?; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
2673

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्याने सावंत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यानंतर सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तसेच सचिन सावंत हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे.

हे ही वाचा : माजी गृहमंत्री काय हनीमूनला गेले काय?; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास 10 मिनिटं चर्चा केली. मात्र, सावंत आणि मुख्यमंत्र्यांमधल्या भेटीचं कारण अद्याप कळलेलं नाही.

महत्वाच्या घडामोडी –

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

“शिवसेनेचे हिंदुत्व आणि मनसेचे हिंदुत्व यात जमीन-आसमानचा फरक”

अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here