मुंबई : नागपुरातील एका ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीला राजकीय वळण देण्याचा होत असलेला दुर्दैवी प्रयत्न,त्यामुळे आता कारवाईच्या निष्पक्षतेबाबत उभे राहत असलेले प्रश्नचिन्ह हा विषय लिहून देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे.प
नागपुरात व्हायरल एका कथित संभाषण ध्वनिफितीची चौकशी करण्याची विनंती मी आपणाला केले आहे. त्या पत्राचे अपेक्षित उत्तर प्राप्त झालेले नाही. तरीही त्याला लेखी उत्तर आपल्या लेटरहेडवर दिल्याचे समाजमाध्यमातून समजले. नागपुरातल्या वृत्तपत्रांनीही आपण त्या पत्राला दिल्याचं वृत्त दिले, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, या पत्रात आरोपीचं नाव आपण नमूद केलं आहे. तसंच त्याचे चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधाकर देशमुख यांच्यासोबत फोटो असल्याने तो भाजपाचा कार्यकर्ता आहे, असा निष्कर्ष काढला आहे. हा पक्षातील अंतर्गत वादाचा विषय असल्याचंही आपण त्या पत्रात नमूद केलं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागपुरातील एका ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीला राजकीय वळण देण्याचा होत असलेला दुर्दैवी प्रयत्न,त्यामुळे आता कारवाईच्या निष्पक्षतेबाबत उभे राहत असलेले प्रश्नचिन्ह.
गंभीर आरोप असल्याने कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्री श्री अनिल देशमुखजी यांना पुन्हा पत्र.. pic.twitter.com/gZdBzkMxee— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“हे सरकार पडणार नाही; मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत”
अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक
‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल
400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र