दिल्ली : भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीसह राजकारणाबाबतही चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा आहे. असं असतानाच दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचे निश्चित झालं आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. मात्र पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“हे सरकार पडणार नाही; मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत”
अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक
‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल
400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र