मुंबई : पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही करोनाबाधित असून त्यांना काही दिवसापूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा करोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातचं कसे ? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते ?,” असे सवाल चित्रा वाघ यांनी केले आहेत.
“या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेचं जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’चं काय झालं की ती फक्त घोषणा होती,” असं ही चित्रा वाघ म्हणाल्या
पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार #कोरोना पेक्षा ही भयानक.याआधी ही अशा सेंटर मध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार व विनयभंगाचे गुन्हे घडलेलेतं. महत्वाचं म्हणजे
महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतात चं कसे ? सुरक्षा यंत्रणा,प्रशासन काय करत असते ? (१/२) pic.twitter.com/JLoHmDt2c2— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 17, 2020
महत्वाच्या घडामोडी-
400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र
दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने
“यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी”
आपापसात मारामाऱ्या करा, पण…; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला