मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच इतर कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन आहे.
दरम्यान, अशा प्रकारे अजित पवार यांनी ट्वविट करत सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केलं आहे.
राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच इतर कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले- चंद्रकांत पाटील
या सरकारलाच कोरोना झाला असून…; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका
भाजपने आमदारांच्या खरेदीऐवजी व्हेंटिलेटर्स खरेदी केले असते तर…; काॅंग्रेसचा भाजपवर निशाणा