मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांना दिले जाणारे लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी संघटक प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
नागरिकांनी मान्य केले आहे की मतदान हा त्यांचा हक्क आहे, तसेच मतदार संघ राखीव असो किंवा सर्वसाधारण आपल्या मतदानाचा उपयोग केला पाहिजे. हे ध्येय पूर्ण झाले आहे. तसेच हे वोट बँकेचे राजकारण आणि सत्ता गमावण्याच्या भीतीने कोणत्याच पक्षात हे राजकीय आरक्षण संपवण्याची हिम्मत नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसला लगावला आहे.
दरम्यान, अनेक आंबेडकरी जनता हेच बोलत आहे की, आता आरक्षण संपवले पाहिजे, पण ते भाजप असो व काँग्रेस ते संपवण्याची हिम्मत कोणातच नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी कधीच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. मी सर्वसाधारण जागेवरून निवडून जिंकलो होतो, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
पालघरची घटना केवळ अफवा पसरल्यामुळे घडली- अनिल देशमुख
मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना
महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका
मी पुन्हा येईन ही घमेंड नाही तर…; नारायण राणेंचा शरद पवारांवर निशाणा