“नवऱ्याचे हात पाय बांधले, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ दाखवला आणि…”

0
210

नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माणसाचा मृतदेह खुर्चीला बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मलिक असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीला 5 पत्नी असल्याचं पोलिसांना समजलं. गेले काही दिवस लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकूल येथील एका फ्लॅटवर राहत होते. 8 मार्चच्या संध्याकाळी लक्ष्मण याची पाचवी पत्नी स्वाती ही त्यांच्या फ्लॅटवर भेटायला गेली. तिनं मोबाईलमध्ये पाॅर्न व्हिडीओ दाखवून लक्ष्मणचे हात आणि पाय बांधले. पती रंगात येताच तिनं सोबत आणलेल्या धारदार चाकूनं त्याचा गळा कापला. पती मेल्याचं कळताच तिनं फ्लॅटवरून पळ काढला.

दरम्यान, पोलिसांनी सर्व पत्नीचे जवाब नोंदवल्यानंतर पाचव्या पत्नीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तिच्यावर संशंय आला. संशय बळावल्यानंतर अधिक चौकशी करून पोलिसांनी स्वातीला अटक केली आहे. या दोघांना एक 8 वर्षाचा मुलगा देखील आहे. तर स्वातीनं 3 महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं होतं. तर स्वातीचं बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहे, असा लक्ष्मणचा आरोप होता. त्यामुळे तो तिला पैसे देत नव्हता त्यामुळे त्यांची भांडण होत होती, अशी माहिती स्वातीनं पोलिसांना दिली.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नरेंद्र मोदीच 2024 ला पंतप्रधान असणार- अभिनेत्री कंगणा रणाैत

मुनगंटीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खतरनाक! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब कॅच; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here