महिला वर्षभर ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबु आझमी

0
313

मुंबई : महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कारांच्या घटना वाढत आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

देशाचा कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. मात्र महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इस्लामी कायद्यामध्ये, एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. खरं तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत, असंही अबु आझमी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here