राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्या संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा

0
276

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. यानंतर भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या अटकेच्या विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.

कोणतेही अटक वॉरंट नसूनही केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रात घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धीने पोलिसांना हाताशी धरून राणे यांना अटक केली आहे. भाजपा याचा निषेध करते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, उद्या बुधवारी संपूर्ण राज्यात राणेंच्या अटकेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचा पोलिसांना आदेश; व्हिडीओ होतोय व्हायरल?

“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अचानक वर्षा बंगल्यावर; राणे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?”

महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपचा कुटील डाव; नाना पटोलेंचा हल्लाबोल

नारायण राणे यांची जी भाषा आहे ती, शिवसेनेचीच भाषा- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here