ज्यांनी ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली; आशिष शेलारांचा खडसेंना टोला

0
341

जळगाव : भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मी कोणतीही टीका-टिप्पणी करणार नाही. मात्र, ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली, असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी एकनाथ खडेसंवर निशाणा साधलाय. जळगाव येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांच्यावर मी कोणतीही टीका-टिप्पणी करणार नाही. मात्र जे जे लोक भाजपला सोडून गेले त्यांची दुर्गतीच झाल्याचे आतापर्यंत दिसून आले. आगामी निवडणुकीत याचे परिणाम दिसून येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

गिरीश महाजन आमचे नेते आहेत. त्यांना साईडलाईन करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. पक्षाच्या राज्यातील प्रश्नासाठी ते राज्यभर फिरत असतात, त्यामुळे स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहू शकत नाहीत, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्यांना देऊन फायदा नाही, तर…”

…म्हणून नारायण राणेंना मंत्रिपद देण्यात आलं- पृथ्वीराज चव्हाण

“अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडं अशी झालीये”

“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं दु:खद निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here